आरोग्य

तंबाखू सोडायची… तंबाखूच्या व्यसनापासून मुक्तता मिळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं आणलं क्विट टोबॅको अॅप.

मुंबई दि.15 फेब्रुवारी – जागतिक आरोग्य संघटनेनं तंबाखूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा उपाय शोधला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं क्विट टोबॅको अॅप (Quit Tobacco App) लॉन्च केलं असून त्यामाध्यमातून सर्व प्रकारच्या तंबाखूच्या व्यसनापासून मुक्तता मिळवण्यासाठी मदत होईल असा दावा करण्यात येत आहे.

( Quit tobacco … The World Health Organization has launched the Quit Tobacco App to get rid of tobacco addiction. )

सर्वच प्रकारातील तंबाखू हा पदार्थ आरोग्यासाठी जीवघेणा आहे. समाजामध्ये खासकरून युवकांमध्ये या व्यसनाची वाढ होताना दिसतेय आणि ते नक्कीच चिंताजनक आहे. जगभरातील युवकांमध्ये सिगारेट ( Cigarettes ) ओढण्याच्या व्यसनामध्ये वाढ झाल्याचं अनेक आकडेवारीतून दिसून येते.

त्यावर उपाय म्हणून जागतिक आरोग्य संघटनेनं आता Quit Tobacco App लॉन्च केलं आहे. ज्यांना तंबाखूचे व्यसन सोडायचं आहे त्यांना हे अॅप मदतशीर ठरेल, या अॅपच्या माध्यमातून जनजागृती होईल असं जागतिक आरोग्य संघटनेच्या ( WHO ) आग्नेय आशियाचे प्रादेशिक संचालक खेत्रपाल सिंह यांनी सांगितलं.

जागतिक आरोग्य संघटनेच्या ( World Health Organization ) वतीनं लॉन्च करण्यात आलेले हे पहिलेच अॅप आहे. या माध्यमातून तंबाखूच्या सर्व प्रकारच्या व्यसनापासून सुटका होण्यास मदत मिळेल. तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी त्या व्यक्तीला मदतशीर ठरेल, त्या व्यक्तीला तंबाखूची तल्लफ कमी करण्यास मदतशीर ठरेल. त्यामुळे समाजातील व्यसनाधीनता कमी होईल असा दावा करण्यात आला आहे.

तंबाखूच्या व्यसनामुळे जगभरात दरवर्षी 80 लाख लोकांचा मृत्यू होतो अशी जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते. त्यामध्ये आग्नेय आशियातील ( Southeast Asia ) 16 लाख लोकांचा मृत्यू होतो. भारताचा समावेश असलेल्या आग्नेय आशियामध्ये तंबाखूचे सर्वाधिक उत्त्पादन घेतलं जातं. तसेच या प्रदेशात तंबाखूचे सर्वाधिक सेवन केलं जातं.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!