शेती विषयक

मराठवाड्यासाठी पुढील दोन दिवस पावसाचे; सतर्कता बाळगा.

परभणी दि.17 अॉगस्ट – मागील वीस दिवसांपासून पावसाने मराठवाड्यात (Marathwada) दडी मारल्यानंतर खरिपातील पिके पाण्याअभावी सुकल्याचे चित्र पाहायला मिळत होते. यामुळे बळीराजा चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होता. परंतू दिलासादायकरित्या कालपासून काही ठिकाणी पावसाचे पुनर्आगमन झाले आहे. पुढील दोन दिवस मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आता हवामान खात्याकडून (Whether department) वर्तवण्यात आली आहे.

(Rain for next two days for Marathwada; Be careful.)

यासंबधी मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे डॉ. के.के. डाखोरे विभागीय हवामान सुचना कार्यालय यांनी दिली आहे. कालपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असून काही जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील 16 ऑगस्ट रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवरा विजांच्या कडकडाटासहा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी हलक्या व मध्यम पावसाची (rain fall) सुरुवात झाली आहे. तर आज दि. 17 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

दि. 18 ऑगस्ट रोजी औरंगाबाद (Aurangabad) व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा विजांच्या कडकडाटासहा जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड (Beed) व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा विजांच्या कडकडाटासहा जोरदार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!