पश्चिमवाहिनी नद्यांचे 135 टीएमसी पाणी गोदावरीत सोडा- जयदत्त क्षीरसागर.

बीड दि.23 अॉगस्ट – मराठवाड्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पाची कामे सुरु करणे व पश्चिमवाहिनी नद्यांचे 135 टीएमसी पाणी गोदावरीत सोडण्याच्या मागणीसाठी बीडचे शिवसेना नेते तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री (Minister of Water Resources) जयंत पाटील यांची मुंबई (Mumbai) येथे भेट घेतली.

(Release 135 TMC water of western rivers in Godavari- Jaydatta Kshirsagar.)

मराठवाडा (Marathwada) हा सिंचनाबाबत मागास राहिला आहे. तसेच सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक पिढ्यानपिढ्या उद्धवस्त झाल्या आहेत. त्यामुळे पश्चिमवाहिनी नद्यांचे 135 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे व गोदावरी (Godavari) नदीच्या पात्रात वळवावे. यामध्ये अभ्यास गट स्थापन केला असून जलदगतीने काम सुरू करण्यात यावीत या मागणीसाठी मुंबई येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांची माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांनी भेट घेऊन निवेदन दिले.

मुंबई येथे झालेल्या बैठकीत मराठवाड्याचा सिंचनाचा प्रश्न सोडवावा, तसेच डिसल्याची वाडी तालुका शिरूर येथील साठवण तलावास मंजुरी देण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची वरिष्ठ पातळीवर सचिवस्तर व विभागीय अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या. तसेच याबाबत महाविकास आघाडी सरकार सकारात्मक पावले, उचलेल असे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!