घात-अपघात

Road accident… सापाच्या भितीने एकाचा मृत्यू ; धारुरमधील घटना.

56 / 100 SEO Score

किल्लेधारूर दि.26 जानेवारी –  Road accident… ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक बसलेल्या सिट खाली साप निघाल्यामुळे चालकाचा ताबा सुटून ट्रॕक्टर पलटी झाले. या अपघातात accident  चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास धारूर शहरा पासून हाकेच्या अंतरावर केज रोडवर घडली. बळीराम रघुनाथ नाईकवाडे (वय 27 वर्षे) रा. घागरवाडा ता.धारुर असे मयत चालकाचे नाव आहे .

तालुक्यातील घागरवाडा येथील बळीराम नाईकवाडे हे स्वतःचा शेतातील ऊस ट्रॅक्टरच्या माध्यमातून येडेश्वरी कारखान्यास घेवून जात होता. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास  धारूर Dharur शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या  हजारी पेट्रोल पंपाजवळ चालक बसलेल्या सिट खालून साप बाहेर निघाला. साप दिसताच चालक गोंधळून गेल्यामुळे त्याचा स्टेरिंगवरील ताबा सुटला. यावेळी ऊसासह ट्रॅक्टर पलटी झाला. चालकाच्या अंगावर ट्रॅक्टर हेड पडले . यात चालकाच्या डोक्याला गंभीर मार लागला. या अपघातात चालक बळीराम नाईकवाडे यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी साप मात्र त्या ठिकाणीच होता. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी साप snake दिसल्यानंतर त्यास मारण्यात आले. अपघातामुळे ऊस रस्त्यावर पडला होता. पोलिसांनी पंचनामा करून वाहतुकीला अडथळा येत असल्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!