धक्कादायक …. अंबाजोगाईत 24 तासात 9 कोरोना बळी; काळजी घेण्याचे आवाहन.

बीड दि.6 एप्रिल – बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा (Corona Positive) आकडा वाढतच चालला असून मृत्यू दरही चिंतेचा विषय ठरत आहे. बीड पाठोपाठ हॉटस्पॉट ठरलेल्या अंबाजोगाईच्या (Ambajogai) स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात आज धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 9 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असुन जिल्ह्याचा मृत्यू दर (Death Rate) चिंता वाढवणारा आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासह स्वारातीच्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

(Shocking …. 9 corona victims in 24 hours in Ambajogai; Appeal to care.)

बीड जिल्ह्यात मार्च 2021 पासुन पुन्हा कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली. एप्रिल उजाडेपर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा (Corona Positive) आकडा शिखराकडे जात आहे. गतवर्षी कोरोनाला घाबरलेले लोक आज मात्र कसलीही पर्वा करत नसल्याचे दिसत आहेत. कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांचा लॉकडाऊन लावला. तर काल पासुन राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे कठोर निर्बंध लादले.

परंतू कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग वाढतच असल्याचे दिसुन येते. आज जिल्ह्यात तब्बल 716 कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण बीड व अंबाजोगाई तालुक्यात आढळून येत आहेत. जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत 4 हजार 300 बाधित आढळले. यात बीड तालुक्याची संख्या 1140 तर अंबाजोगाई तालुक्याची संख्या 913 आहे. आज अंबाजोगाई (Ambajogai) येथे 24 तासात तब्बल 9 कोरोना बाधितांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या नऊ जणांवर अंबाजोगाई नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने अंत्यविधी करण्याची ही वर्षभरातील दुसरी घटना आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील कोरोना बाधितांचा यात समावेश आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर (Death Rate) अधिक असून उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनही आता लोकांना कोरोनाला सहजतेने न घेता काळजी करण्याचे आवाहन करण्याची वेळ आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!