धक्कादायक … पत्नी व मुलीची हत्या करुन पतीची आत्महत्या; सिरसाळ्यातील थरार…

परळी दि.25 सप्टेंबर – पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलीची तीक्ष्ण हत्याराने हत्या करुन पतीने गळफास लावल्याची धक्कादायक घटना परळी (Parli) तालुक्यातील सिरसाळा येथे सकाळी उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. याघटनेमुळे मात्र सिरसाळ्यात खळबळ उडाली आहे.
(Shocking … Husband commits suicide by killing wife and daughter; Thrill in the head …)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिरसाळा येथील मोहा रोड परिसरात आज शनिवारी (दि.25) खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलीची तीक्ष्ण हत्याराने खून नंतर पतीने गळफास लावत जीवन संपविले. सध्या याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु असून या घटनेमागचे कारण अद्याप समोर आले नाही. अल्लाबक्ष शेख असे त्या मृत कुटुंबप्रमुखाचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अल्लाबक्षने शुक्रवारी रात्री पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलीची तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करून हत्या (Murder) केली आणि त्यांनंतर स्वतःही गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिकृत माहिती मात्र मिळू शकली नाही.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक प्रदीप एकशिंगे, उपनिरीक्षक महेश विघ्ने, शेळके, मिसाळ, पोलिस नाईक अंकश मेंढके, अर्शद सय्यद, अक्षय देशमुख व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई (Ambajogai) रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या पोलिस (Police) तपास सुरू असून त्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होऊ शकणार आहे.