धारुर तालुक्यात शेतीच्या वादातून दलित कुटुंबावर हल्ला; नऊ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.

किल्ले धारूर दि.27 मे – धारुर तालुक्यातील कोथिंबीरवाडी येथील दलित कुटुंबावर शेतीत काम करत असताना येथील शेजाऱ्यांनी हल्ला करत बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि.26) सकाळी दहा वाजता घडली. याप्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, सध्या सर्वत्र खरीप हंगामाची पुर्व तयारीस शेतकरी लागला आहे. याच काळात शेतकरी शेत दुरुस्ती करत असताना अनेक ठिकाणी बांधावरुन वाद होण्याच्या घटना घडतात. अशीच एक घटना धारुर तालुक्यातील कोथिंबीरवाडी येथे घडली. येथील शेतकरी बालासाहेब रोहिदास उजगरे हे बुधवारी सकाळी शेतात काम करत करुन शेती दुरुस्ती करत होते.

यावेळी शेजारील अजय भानुदास तिडके व सिद्धेश्वर भानुदास तिडके यांनी उजगरे यांच्या शेतात दगडे टाकण्यास सुरुवात केली. यानंतर बालासाहेब उजगरे यांनी दगड टाकण्यास मज्जाव केला असता, अजय भानुदास तिडके, सिद्धेश्वर भानुदास तिडके, मच्छिंद्र विठ्ठल तिडके, भानुदास विठ्ठल तिडके, चंद्रसेन विठ्ठल तिडके, रजनीकांत मच्छिंद्र तिडके, प्रतीक चंद्रसेन तिडके, अर्जुन कुंडलिक तिडके व कुंडलिक विठ्ठल तिडके सर्व राहणार बोडखा ता. धारूर यांनी उजगरे कुटुंबाला मारहाण केली.

ही मारहाण होत असताना उजगरे यांची पत्नी हल्लेखोरांना विनवण्या करत असतानाही त्यांना त्यांची दया-माया आली नाही. जातीवाचक शिवीगाळ करत,लाठ्या काठ्या व दगडाने उजगरे कुटुंबाला नऊ जण मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत बालासाहेब उजगरे शकुंतला उजगरे व निखिल उजगरे जखमी झाले होते. जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

दिंद्रुड पोलीस स्टेशनला गुरुवारी (दि.26) रात्री बालासाहेब उजगरे यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त नऊ जणांवर ॲट्रॉसिटी सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी पंकज कुमावत करत आहेत. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हल्लेखोरांच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

( Attack on Dalit family in Dharur taluka over agricultural dispute; Nine persons have been charged with atrocity. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!