जवान सूर्यकांत तेलंगे यांना पठाणकोट चकमकीत विरमरण; पत्नी आहे अंबाजोगाईत अधिपरिचारीका.

5 / 100

लातूर दि.27 जुन – शिरूर अनंतपाळ तालुक्यातील थेरगावचे रहीवाशी जवान सूर्यकांत शेषराव तेलंगे (वय 35) यांना सोमवारी पहाटे पठाणकोट चकमकीत विरमरण आले आहे. ही माहिती कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. शहीद जवान तेलंगे यांच्या पत्नी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ शासकीय रुग्णालयात अधिपरिचारीका असल्याचे समोर आले आहे.

शेतकरी कुटुंबातील जवान सूर्यकांत तेलंगे यांना लहानपणापासून सैन्य दलात जाण्याची इच्छा होती. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण गावात पूर्ण केले आणि रापका येथे बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी सैन्य दलात (Indian Army) भरती होण्यासाठी तयारी सुरू केली. महाड येथे भरतीपूर्व प्रशिक्षण घेतले आणि सन 2007 मध्ये ते सैन्य दलात भरती झाले.

साेमवारी पहाटे पठाणकोट येथील सीमेवर चकमक झाल्याने त्यात जवान सूर्यकांत तेलंगे हे शहीद झाल्याची माहिती सैन्य दलाच्या कार्यालयातून देण्यात आल्याची माहिती शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी दिली. शहीद जवान सूर्यकांत तेलंगे यांचा विवाह सन 2014 मध्ये झाला होता. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.

( Jawan Suryakant Telange killed in Pathankot encounter; The wife is a nurse in Ambajogai. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!