धक्कादायक … बीड आगारातील दोनशे एसटी कर्मचाऱ्यांनी मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी.

बीड दि.27 डिसेंबर – जिल्ह्यात काही ठिकाणी एसटी पुर्वपदावर येत असतानाच बीड (Beed) आगारातील जवळपास दोनशे एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.
(Shocking … Two hundred ST employees in Beed depot asked for permission to die voluntarily.)
बीड आगारात (Depot) मागील 54 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा (ST employees) संप (Strike) सुरू आहे. संपाला 54 दिवस उलटूनदेखील अद्यापही विलीनीकरणाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे एसटी महामंडळाच्या सेवेसाठी सद्य:स्थितीत कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती योग्य राहिलेली नाही.
राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती वाईट असताना देखील राज्य सरकार याबाबत विचार करत नाही. 54 दिवस उलटल्यानंतर बीड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे.
राज्याचे प्रमुख या नात्याने एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्यात यावी व आम्हाला आर्थिक आणि मानसिक त्रासातून मुक्त करावे असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
आतापर्यंत जवळपास 200 हून अधिक कर्मचाऱ्यांनी या पत्रावर सह्या केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलं आहे. दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी आज विधानभवनात निलंबित कर्मचाऱ्यांचे निलंबन (suspension) मागे घेणार नसल्याचा पुनर्उच्चार केला.