मंत्रिमंडळ खाते वाटप ; पहा कुणाकडं कोणतं खातं.

मुंबई दि.10 अॉगस्ट – राज्यात नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं असुन राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या मंत्र्यांना मंगळवार दि.9 रोजी पद आणि गोपिनियतेची शपथ दिली. मंगळवारी सकाळी शपथविधी पार पडल्यानंतर आज दि.14 रविवारी खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.
राज्यात 30 जुलै रोजी सत्तांतर होवून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती. तब्बल 38 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलं. यांनतर आज रविवारी नव्या मंत्र्यांच खातेवाटप झालं. खातेवाटपात नगरविकास खातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडेच ठेवण्यात आलंय. तर गृह, अर्थ, महसूल अशी महत्वाची खाती भाजपकडे ठेवण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह व अर्थ खातं असणार आहे.
कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?
एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री, नगरविकास
देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री, गृह, अर्थ
राधाकृष्ण विखे पाटील – महसूल पशुसंवर्धन
चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण
सुधीर मुनगंटीवार – वन, मत्स्य
मंगलप्रभात लोढा – पर्यटन
रविंद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम
उदय सामंत – उद्योग
दीपक केसरकर – शालेय शिक्षण
सुरेश खाडे – कामगार
दादा भुसे – बंदरे व खनिकर्म
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता
गिरीश महाजन – ग्रामविकास वैद्यकीय शिक्षण
विजयकुमार गावित – आदिवासी विकास
अब्दुल सत्तार – कृषि
अतुल सावे – सहकार
तानाजी सावंत – आरोग्य व कुटूंब कल्याण
संजय राठोड – अन्न व औषध
शंभुराज देसाई – उत्पादन शुल्क
संदीपान भुमरे – रोजगार हमी
Allocation of Cabinet Accounts; See who has which account.