धारूरहून एसटी सुसाट… जिल्हाअंतर्गत फेऱ्या सुरू, दिवसात 24 फेऱ्या.

किल्लेधारूर दि.23 डिसेंबर – धारूर एसटी आगारातून (ST Depot) बुधवारी शंभर कामगार कामावर परतल्यामुळे 24 बस सेवा सुरू झाल्या. यामुळे जिल्हाअंतर्गत सर्व मार्गावर बस (ST Bus) प्रवासी वाहतूक सुरू झाल्या असून प्रवाशी वर्गात समाधान दिसत आहे.
(ST ran from Dharur … rounds started within the district, 24 rounds per day.)
धारूर येथील एसटी आगारातील संपावर (Strike) असणारे बहूतांशी कर्मचारी हे कामावर रुजू झाले असून बुधवारी 50 वाहक चालक व 50 मेकानिकल असे शंभर कर्मचारी रुजू झाले. बुधवारी केज (Kaij), माजलगाव (Majalgoan), अंबाजोगाई (Ambajogai) व वडवणी अशा 24 फेऱ्या झाल्या. यामधून विस हजार रुपये उत्पन्न झाल्याची माहिती व्यवस्थापनाकडून मिळाली.
आज गुरुवार (दि.23) सलग दुसऱ्या दिवशी बस फेऱ्या सुरळीत पणे सुरू होत्या. प्रवाशांनी एसटी बसने प्रवास करावा व इतर कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे व प्रवाशाची सोय करावी असे आवाहन आगारप्रमूख शंकर स्वामी यांनी केले आहे. बस फेऱ्या सुरु झाल्यामुळे बस स्थानकावर खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी घेतलेला ताबा आज मात्र मोकळा झाला.
जवळजवळ दिड महिन्यानंतर रस्त्यावर एसटी बस दिसून येत आहेत. बससेवा बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल होताना दिसत आहे. कालपासून धारुर (Dharur) आगारातील बस फेऱ्या सुरु झाल्यामुळे प्रवाशांचे बेहाल दुर झाले. बीड (Beed) जिल्ह्यात सर्वाधिक बसेस धारुर आगारातून सोडण्यात आल्या आहेत.