कोविड-१९ योध्द्यांचा सन्मान

किल्लेधारूर दि.७(वार्ताहर) मुस्लिम संघर्ष समिती महाराष्ट्र च्या वतीने किल्ले धारूर शहरातील कोविड १९ आपत्तीमध्ये काम केल्याबद्दल कोविड योध्दा म्हणून आज सन्मानित करण्यात आले.
कोविड-१९ आपत्तीमध्ये शहरात जीवाची पर्वा न करता नागरीकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र काम करणाऱ्यांचा सन्मानपत्र देवून मुस्लिम संघर्ष समितीच्या वतीने घरी व कार्यालयात जावून सन्मानित करण्यात आले. यात तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन, नगर परिषद प्रशासन, पदाधिकारी, सर्व पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी मुस्लिम संघर्ष समितीचे इंजि. सादेक इनामदार, ॲड. सय्यद साजेद, सय्यद रज़्ज़ाक, शेख अकरम, शेख शादाब, इमरान कादरी, सोहैल जरगर आदी मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते.