suicide… धारुर तालुक्यात पुन्हा आत्महत्या ; गळफास लावून संपवले जीवन.

किल्लेधारुर दि.2 जानेवारी – suicide… धारुर तालुक्यातील आवरगाव येथील गणेश विठ्ठलराव नखाते (वय वर्ष 50) यांनी त्यांच्या शेतामधील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन दि.1 सोमवार रोजी आत्महत्या केली. सरकार मराठा आरक्षण देत नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
धारुर Dharur तालुक्यातील आवरगाव येथील शेतकरी गणेश विठ्ठलराव नखाते यांनी त्यांच्या शेतामध्ये बोरीच्या झाडाला गळफास घेऊन दि.1 जानेवारी सोमवार रोजी आत्महत्या केली. आत्महत्येचे मुख्य कारण हे मराठा आरक्षण आहे. त्यांचा मुलगा व सून उच्चशिक्षित असताना त्यांना आरक्षण नसल्यामुळे नोकरी लागत नाही हे डोक्यात घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्या करत असताना चिठ्ठी लिहून ठेवली. चिठ्ठीत त्यांनी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यापासून सरकार त्यांना तारखेवर तारीख देत असल्याचे लिहले असून 20 तारखेपर्यंत आरक्षण देण्यात यावे अशी विनंती सरकारला केली आहे. त्यांच्या या टोकाच्या भुमिकेमुळे आवरगाव, हसनाबाद, धारूरसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पाश्चात मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.