विनायक मेटे यांच्या अपघाताचा संशय बळावला ; पोलिसांकडून कसून तपास सुरु.

बीड दि.16 अॉगस्ट – शिवसंग्रामचे अध्यक्ष (Shiv Sangram) विनायक मेटे (Vinayak Mete) यांचा रविवारी पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway) अपघातात (Accident ) मृत्यू झाला. काल दि.15 सोमवारी बीड येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) आयोजित केलेल्या एका बैठकीला ते बीडहून मुंबईला जात होते. पहाटे पाचच्या सुमारास भातण बोगदा (Bhatan Tunnel) ओलांडण्याआधी त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे (Vinayak Mete) यांचा जागिच मृत्यू झाला. मृत्यूनंतर विविध राजकीय नेत्यांनी दु: ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. दरम्यान अनेक कार्यकर्त्यांकडून मेटे यांच्या अपघाताबाबत संशय व्यक्त करत चौकशीची मागणी पुढे येत होती.
या सर्व घडामोडीनंतर मेटे व त्यांच्या डॉक्टर पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. विनायक मेटे यांच्या अपघातानंतर दोन तासांत काय घडलं ? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे. बीडमध्ये (Beed) एका वृत्तवाहीनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी अपघातानंतर घडलेल्या घटनांबाबत संशय व्यक्त केला. अपघातानंतर काय घडलं याची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मेटे यांच्या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी आठ पथक नियुक्त करुन तपास सुरु केला. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहनाला ताब्यात घेण्यात पोलिसांना (Police) यश आले आहे. या अपघात प्रकरणी तीन साक्षीदारांची खालापुरचे डिवायएसपी संजय शुक्ला यांनी चौकशी केली. तर मेटे यांच्या वाहन चालकाची चौकशी सुरु आहे. मेटे यांच्यासह चालक व सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलवर आलेल्या सर्व कॉल रेकॉर्ड तपासली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच काही कार्यकर्त्यांच्या अॉडीओ क्लीप समाज माध्यमात व्हायरल होत असून यामुळे मेटे यांच्या अपघाताबाबत संशय बळावल्याचे दिसून येत आहे.
( Suspicion of Vinayak Mete’s accident increased; A thorough investigation has been started by the police. )