घात-अपघात

हृदयद्रावक… मुलीला हळद लागली अन् दुःखाचा डोंगर कोसळला; वडवणीत करंट लागून नवरीच्या वडिलांचा मृत्यू.

वडवणी दि.23 एप्रिल – वडवणी (Wadvani) तालुक्यातील टोकेवाडी येथील लग्नाचा मंडप उभारताना विद्युत तारेचा करंट लागून नवरी मुलीच्या वडीलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.  मुलीला हळद लागली आणि या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, या दुःखद बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टोकेवाडी येथील हनुमंत अंबादास डोंगरे (वय 34 वर्षे) या वधू पित्याचा मृत्यू झाला आहे. हनुमंत अंबादास डोंगरे यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीचा विवाह हिवरा पहाडी येथील एका चांगल्या कुटुंबात ठरला होता. त्यानुसार शुक्रवारीच नवरदेवाला आणून नवरा नवरीला हळद लावण्यात आली. अगदी लग्नाची जय्यत तयारी दोन्ही कुटुंबाकडून सुरु करण्यात आली होती.

उद्या रविवारी दि. 24 एप्रिल रोजी दुपारी मुलीचा विवाह होणार होता. यासाठी जोरदार तयारी सुरू केली होती. सर्व कुटुंब व नातेवाईक एका आनंदाच्या डोहात बुडाले होते. परंतु काल या आनंदावर या दुर्दैवी घटना घडल्याने दुःखाचा डोंगर कोसळला. विवाह मंडपाला विद्युत तारेचा करंट (Electric wire shock) लागल्यामुळे मंडपात अँगल च्या जवळ बसलेली व उभे राहिलेल्या सात ते आठ जणांना विजेचा धक्का बसला.

यात काहीजण या धक्क्याने बाजूला फेकले गेले. मात्र नवरीच्या वडिलांना एवढा जबर धक्का बसला की ते जागीच मृत्यू पावले. काही क्षणातच या लग्न सोहळ्यावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय चिंचवण येथे आणला असून शवविच्छेदन करण्यात आले आहे. यानंतर मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

( Heartbreaking … The girl got turmeric and the mountain of sorrow collapsed; The father of the bride died due to electric shock in Wadvani. )

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!