चुलत्याच्या अश्लिल मेसेजमुळे पुतणीची आत्महत्या…

पिंपरी चिंचवड: दि.१२- चुलत्याने अल्पवयीन पुतणीचा विनयभंग केला आणि नंतर वारंवार अश्लील मेसेज पाठवून मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून पुतणीने आत्महत्या (suicide) केल्याचा आरोप आईने दिलेल्या तक्रारीत केला असून आरोपी चुलत्यावर भोसरी पोलिसात (Police) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवडच्या इंद्रायणीनगर परिसरात ६ सप्टेंबरला मुलीने घराच्या गॅलरीतून उडी घेत आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली होती. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे एप्रिल २०१८ मध्ये पीडित मुलगी औरंगाबाद (Aurangabad) येथील काकाकडे सुट्टीसाठी गेली होती. तेंव्हा काकानेच पुतणीची छेड काढली. म्हणून ती लगेचच पिंपरी चिंचवड मधील तिच्या घरी परतली. मात्र काकाने वारंवार अश्लील मेसेज करत त्रास देणं सुरूच ठेवलं, याच त्रासाला ती कंटाळली आणि म्हणूनच ६ सप्टेंबरला तिने राहत्या घराच्या गॅलरीतून उडी घेत आत्महत्या (suicide) केली, असा आरोप करत आईने ११ डिसेंबर म्हणजे काल गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस (Police) पुढील तपास करत आहेत.