कोरोंना विशेष

आज बीड जिल्ह्यात 711; बीड, अंबाजोगाई पाठोपाठ आष्टीचेही शतक. धारुरमध्ये 11 तर केजमध्ये 45 रुग्ण.

बीड दि.8 एप्रिल- राज्यात कोरोनाचा उद्रेकात काल मोठी संख्या समोर आली. बीड जिल्ह्यातही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून येत आहेत. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 5899 प्राप्त अहवाला पैकी 580 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. आजचा कोरोना रुग्णांचा आकडा अधिक आहे. 5188 जण निगेटिव्ह आली आहेत.

आज बत्तिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 189 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात बीडनंतर दुसरे हॉटस्पॉट ठरलेल्या अंबाजोगाई तालुक्यात आज 158 तर आष्टीत पहिल्यांदाच 102 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 11 केजमध्ये 45 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

(711 in Beed district today; Beed, Ambajogai followed by Ashti’s century. 11 in Dharur and 45 in Kaij.)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-189, अंबाजोगाई-158, आष्टी-102, धारुर-11, गेवराई-54, केज-45, माजलगाव-56, परळी-44, पाटोदा-22, शिरुर-16, वडवणी-14
अशी आहे.

कोविड-19 (covid-19) चा राज्यासह बीड जिल्ह्यात उद्रेक वाढला आहे. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.8 गुरुवारी दुपारी आजची आकडेवारी जाहिर केली. बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या गेल्या काही दिवसात प्रचंड वाढली आहे. मंगळवारी सर्वाधिक 716 तर बुधवारी 580 तर आज गुरुवारी 711 कोरोना बाधित आढळून आली. जिल्ह्याचा मृत्यू दरातही दिवसेंदिवस वाढच होत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्यात दिवसभरात तब्बल 59 हजार 907 कोरोना बाधित (Corona Positive) रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं, आज 322 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत असताना आज हे गंभीर चित्र पाहायला मिळालं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!