बीडमध्ये बाईक शोरुमला आग; लाखो रुपयांच्या नव्या कोऱ्या बाईक्स जळून खाक.

बीड दि.27 फेब्रुवारी – बीड (Beed) शहरातील नगर रोड भागात असलेल्या बाईक शोरुमला भीषण आग लागली आहे. या आगीत लाखो रुपयांच्या नव्या कोऱ्या बाईक्स जळून खाक झाल्या आहेत.

( Bike showroom fire in Beed; Burn new empty bikes worth millions of rupees. )

बीड शहरात हे हिरो मोटरसायकल (Hero motors) शोरूमसह गोदामाला भीषण आग लागली आहे. आज रविवारचा दिवस असल्याने सुदैवाने यामध्ये कर्मचारी कार्यरत नव्हते, मात्र आगीची माहिती मिळताच मालकाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

बीड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले. अखेर बीड अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आगीत लाखोंच्या नवीन मोटारसायकली जळून खाक झाल्या आहेत.

दरम्यान याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानं बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. आग एवढी भीषण असून गोदामासह शोरूम मध्ये देखील पसरली होती. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरलेले दिसून येत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!