वडवणी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी वंदना जगताप; उपनगराध्यक्षपदासाठी बन्‍सी मुंडे.

वडवणी दि.14 फेब्रुवारी – वडवणी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सौ‌. वंदना शेषराव जगताप यांची निवड झाली. राष्ट्रवादी शहर बचाव आघाडीचे बन्सी केशवराव मुंडे यांची उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल असून वडवणी नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.

( Vandana Jagtap as the Mayor of Vadvani Nagar Panchayat; Bansi Munde for the post of Deputy Mayor. )

राष्ट्रवादी व राष्ट्रवादी पुरस्कृत शहर बचाव आघाडीचे 9 नगरसेवक तर भाजपाचे 8 नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादीकडून (NCP) सौ.वंदना शेषराव जगताप तर भाजपाकडून सौ.मंगला राजाभाऊ मुंडे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

यामध्ये सौ.वंदना शेषराव जगताप यांना 9 मते पडली. यावेळी भाजपाच्या (BJP) एका सदस्याचा मताचा अधिकार काढल्यामुळे भाजप सदस्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. जगताप या नगराध्यक्ष (mayor) म्हणून निवडून आल्या. उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी शहर बचाव आघाडीचे बन्‍सी केशवराव मुंडे व भाजपाकडून सौ.मीरा सुधीर ढोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उपाध्यक्ष निवडीतही मुंडे यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे.

ही नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके, माजी आमदार केशव दादा आंधळे, बाबुराव पोटभरे, जयसिंग भैय्या सोळंके यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती व त्यांना यामध्ये यश मिळाले आहे. निवड जाहीर होताच फटाक्यांची आतषबाजी करून गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.

आमदार प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke), जि.प. बांधकाम सभापती जयसिंग सोळंके (Jaising Solanke)हे वडवणीत तळ ठोकून आहेत. निवड प्रक्रिया शांततेत पार पडली असुन वडवणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आनंद कांगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!