क्राईम न्यूज…. गेवराई तालुक्यात खुनी हल्ला; धारुर तालुक्यातून एक जण बेपत्ता.

गेवराई दि.6 जुलै – अवैध धंद्याच्या बातम्या का छापतोस याद राख, या पुढे आमच्या विरोधात बातम्या देशील तर, तुला जिवे मारू, अशी धमकी देत, पाच युवकांनी पत्रकार जुनेद बागवान यांना व त्यांच्या सोबत असलेल्या एका मित्रावर लोखंडी राॅडने व कोयत्याने मारहाण करत जिवघेणा हल्ला (Murder attack) केल्याची घटना सोमवार दि.5 रोजी घडली असून, पत्रकार बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Crime News …. Murder attack in Gevrai taluka; One missing from Dharur taluka)

या हल्ल्यात पत्रकार बागवान बालंबाल बचावले असून, त्यांच्या मित्राला गंभीर दुखापत झाली आहे. त्यास गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पत्रकार बागवान यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाचही युवकांना तातडीने अटक करावी, अशी मागणी गेवराई येथील पत्रकारांनी केली असून, या हल्याचा तिव्र निषेध केला आहे.

पत्रकार (Press Reporter) जुनेद बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 05 जून रोजी 3.30 वा.सुमारास मला समजले की , मुस्लीम कब्रस्तान मन्यारवाडी रोड गेवराई येथील राम शिवाजी म्हेत्रे याने कब्रस्तानची विटंबना केली आहे. सदरील माहीतीची शहानिशा करण्यासाठी मी व माझ्यासोबत शहानवाज शब्बीर बागवान ,असे आम्ही दोघेजण खाजगी वाहनाने त्या ठिकाणी गेलो असता, त्याठिकाणी कब्रस्तानामध्ये माउली आनंद बाप्ते , सागर उर्फ दत्ता आनंद बाप्ते , राम शिवाजी म्हेत्रे , बबलू रमेश सावंत , शुभम आनंद बाप्ते हे पाचजण कब्रस्तानामध्ये पत्ते खेळत व दारु पित बसलेले होते.

त्यांना मी पञकार (Press Reporter) आहे , याची जाणीव असल्याने, ते करीत असलेल्या कृत्याचे फोटो वर्तमानपत्रात प्रसिध्द करीन, असे त्यांना वाटल्याने वरील युवकांनी आमच्या दिशेने धाव घेतली. तसेच, राम शिवाजी म्हेत्रे याने लोखंडी रॉड माझ्या डाव्या हातावर फेकून मारला. माउली बाप्ते याने कोयत्याने शहानवाज बागवान यास कपाळावर मारल्याने गंभीर दुखापत केली आहे.

सागर उर्फ दत्ता आनंद बाप्ते हा पिस्तुल घेवून माझे मागे लागला. राम शिवाजी म्हेजे, बबलु रमेश सावंत, शुभम आनंद बाप्ते यांनी लोखंडी गजाने आम्हा दोघांना मारहाण केली. या हल्यामध्ये शहानवाज बागवान हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याला गेवराई उपजिल्हा रुग्णालयातुन दाखल करुन पुढील उपचार कामी जिल्हा रुग्णालय बीड येथे पाठवले आहे.

दरम्यान, पत्रकार बागवान हल्ल्यामधुन बचावले असून जर बातमी छापली तर जिवे मारण्याची धमकी दिली असून, या हल्यात त्यांच्या हाताल व शरीराला मुक्का मार लागला आहे. माउली आनंद बाप्ते , सागर उर्फ दत्ता आनंद बाप्ते हे सराईत गुन्हेगार असून यांच्यापासुन माझ्या जिवाला पुढेही धोका असल्याचे सांगून, तू दरवेळेस पेपरमध्ये अवैध धंद्याबाबत बातम्या छापतो. असेही सांगून त्याने धमकावले असल्याचे पत्रकार जुनेद बागवान यांनी फिर्यादीत म्हटले असुन पत्रकार सरक्षण कायदा सह विविध कलमा खाली गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पत्रकार बागवान यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाचही युवकांना तातडीने अटक करावी, अशी मागणी गेवराई येथील पत्रकारांनी केली असून, या हल्याचा तिव्र निषेध केला आहे.

धारुर तालुक्यातून तरूण बेपत्ता …
धारुर तालुक्यातील कांदेवाडी येथील 32 वर्षीय युवक शनिवार पासून बेपत्ता (missing) झाला असून दिंद्रुड पोलिसात (Police) याबाबत नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कांदेवाडी येथील अमोल मधुकर पारवे हा युवक शनिवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडला होता. सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने पारवे कुटुंबाने नातेवाईकात संपर्क केला असता त्याचा संपर्क न झाल्याने व मोबाईल बंद असल्याने दिंद्रुड पोलिसात नोंद करण्यात आली आहे. तीन दिवस उलटूनही पोलिसात याची दखल घेतली गेली नसल्यामुळे सोमवारी कांदेवाडी येथील जमाव दिंद्रुड पोलीस स्टेशन मध्ये आला होता.

याप्रसंगी प्रसार माध्यमांनी दिंद्रुड पोलिसांशी संपर्क केला असता हे प्रकरण व्यवहाराचे असून तो युवक लवकरात लवकर कसा सापडेल यासाठी प्रयत्न करत आहोत असे उत्तर दिंद्रुड पोलिसांकरवी मिळाले. दरम्यान नातेवाईकांनी तीन दिवस उलटून गेल्यामुळे व अमोल पारवे याचा संपर्क होत नसल्याने दिंद्रुड पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!