गुरुवारी पुन्हा वाढ… बीड जिल्ह्यात आजचे कोरोना बाधित; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.26 अॉगस्ट – काही दिवसात ओसरत असलेली बाधितांची संख्या आज पुन्हा वाढली आहे. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 4564 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 105 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4459 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Today’s corona disrupted in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-25, अंबाजोगाई-7, आष्टी-38, धारुर-4, गेवराई-2, केज-9, माजलगाव-0, परळी-3, पाटोदा-5, शिरुर-1, वडवणी-11 अशी आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून गेल्या 24 तासांतील कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. बुधवारी राज्यात तब्बल 5031 नवे रुग्ण आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ही रुग्ण संख्या 4 हजाराच्या घरात होती. पण, आता अचानक त्यात वाढ झाली आहे. तर 216 जणांचा कोरोनामुळे मृत्यू (corona death) झाला आहे.

मृत रुग्णांची संख्या वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी ही संख्या 105 इतकी होती. बुधवारी दुपट्टीने वाढ झाली आहे. राज्यात मृत्यूदर हा 2.12 टक्के इतका झाला आहे. रुग्णांची संख्या वाढली असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. बुधवारी 4,380 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.07 टक्के इतके आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णाची संख्या पुन्हा 50 हजाराच्यावर पोहोचली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!