बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…

बीड दि.8 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत आहे. आज 4055 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 148 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3907 जण निगेटिव्ह आली आहेत. बुधवारी अचानक वाढलेली संख्या आज पुन्हा उतरलेली दिसत आहे.
(Today’s corona update from Beed district …)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-16, अंबाजोगाई-5, आष्टी-46, धारुर-6, गेवराई-35, केज-16, माजलगाव-2, परळी-1, पाटोदा-12, शिरुर-7, वडवणी-2 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांचा वेग मंदावला आहे. सध्या दररोजच्या अहवालात नवीन बाधितांची संख्या शंभरीच्या आसपास स्थिरावलेली आहे. मात्र काल बुधवारी ही संख्या 188 वर गेली होती. असेच काहीसे चित्र राज्यासह देशातही कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत कमालीची चड उतार पहावयास मिळत आहे.
दरम्यान, राज्यात सातत्याने नव्या रुग्णसंख्येत, मृत्यूच्या संख्येत आणि रुग्ण बरे होण्याच्या संख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. आज सलग दुसऱ्या दिवस नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 9 हजार 558 नव्या कोरोनाबाधित आढळले असून 147 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 61 लाख 22 हजार 893 वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 1 लाख 23 हजार 857 जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्या राज्यात 1 लाख 14 हजार 625 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी दिवसभरात राज्यातील 8 हजार 899 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण 58 लाख 81 हजार 167 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.