माझं गाव

धारुरच्या तरुणाला कारची धडक; तरुणासह कारमधील चौघांचा दुर्दैवी मृत्यू.

किल्लेधारूर दि.20 अॉक्टोंबर – धारुर (Dharur) येथील तरुणाला भरधाव कारने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील पती पत्नीसह मुलाचा या अपघातात (Accident) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (दि.20) पहाटे घडली. अपघातस्थळी सकाळी कर्नाटक (Karnataka) पोलिसांनी (Police) धाव घेतली.

(Dharur’s youth hit by a car; The unfortunate death of four people in a car, including a young man.)

धारुर शहरातील कसबा विभागातील ताहेर मनसब पठाण (वय 33) यांचा ट्रक मालवाहतूकीचा व्यवसाय आहे. काल (दि.19) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ते आपल्या ट्रक क्र. एमएच 12 सिएच 3166 मधून उसतोड मजुरांची जनावरे घेवून कारखान्याकडे गेले. मात्र कर्नाटक मधील विजापुर (Vijayapur) पासून दहा कि.मी. अंतरावर पहाटे ट्रकमध्ये येअर आल्याने ट्रक संपूर्ण रस्त्याचेखाली घेवून येअर काढत उभे होते. याच वेळेच एका भरधाव अर्टिगा कारने (क्र. केए 28 एन 9513) धडक दिली. यात ताहेर यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनूसार गोवा येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्ती आपल्या कुटूंबियांसह कर्नाटकातील आपल्या गावी जात असताना झोपेच्या धुंदीत विरुध्द दिशेला उभ्या ट्रकला समोरुन धडक दिली. या अपघातात ट्रक चालक ताहेर यांच्यासह चालक शिक्षकाच्या पत्नीसह दोन मुलं ठार झाल्याचे कळते.

विजापुर येथील शासकीय रुग्णालयात अपघातातील मृतांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहेत. ताहेर पठाण यांच्या अकाली अपघाती निधनामुळे धारुर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. ताहेर हे अतिशय शांत हसतमुख असल्याने त्यांचा मित्रवर्ग मोठा होता. कोरोना काळात सर्व वाहतूक ठप्प झाल्याने नुकताच व्यवसायाला सुरुवात केली होती. संपुर्ण कुटूंबाची जबाबदारी उचलणारा कर्ता गेल्याने कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली, आई, वडिल, भाऊ असा परिवार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!