घात अपघात

भीषण दुर्घटना … अंमळनेरकडे येणारी बस नदीत कोसळून 13 ठार तर 15 जण बेपत्ता.

50 / 100

मुंबई दि.18 जुलै – अंमळनेरकडे येणारी बस नदीत कोसळून 13 ठार तर 15 जण बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसचा (Maharashtra ST Bus) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) धारमध्ये एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

याबाबत प्राप्त माहितीनूसार आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र राज्याची एसटी बस इंदूरहुन अंमळनेरकडे निघाली होती. या बसमध्ये जवळजवळ 50 ते 55 प्रवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान बस इंदूरहुन जळगावच्या दिशेने जात असताना नर्मदा नदीवरील पुलावरुन खाली कोसळली. हा भीषण अपघात घडल्यानंतर तात्काळ मदतकार्य सुरु करण्यात आले. क्रेनच्या साह्याने बस नदीतून बाहेर काढण्यात आली.

15 जणांना वाचवण्यात यश आले असून आत्तापर्यंत 13 मृतदेह हाती लागले आहेत. अजूनही 15 जण बेपत्ता असल्याचे कळते. सदर अपघाताची माहितीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दुजोरा दिला. चन्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही जळगावमधील अमळनेर येथे येणार होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसटीचे अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना बस अपघाताची माहिती देण्यात आल्याची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आम्ही अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या दुःखात सहभागी असल्याचा संदेश दिला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान (Chief Minister Shivraj Chauhan) यांनी घटनास्थळी एसडीआरएफला (SDRF) दाखल होण्याचे निर्देश दिले. मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री चौहान हे इंदूर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!