घात-अपघात

terrible accident भीषण अपघातात दोन डॉक्टरचा मृत्यू ; आडस रोडवरील घटना.

50 / 100

अंबाजोगाई दि.9 जून – terrible accident आडसहून आरोग्य शिबिर उरकून अंबाजोगाईकडे परतणाऱ्या कारचा चनईजवळच्या खडी क्रेशरनजीक दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात अंबाजोगाई Ambajogai येथील नामवंत डॉक्टरसह अन्य एका डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. terrible accident… Two doctors died in a terrible accident; Incident on Adas Road.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि.9 शुक्रवार रोजी आडस ता. केज येथे एक आरोग्य शिबिरात उपस्थित राहिलेले नामवंत फिजिओथेरपिस्ट Physiotherapist डॉ. प्रमोद बुरांडे व डॉ. रवि सातपुते दुपारी 12 च्या सुमारास अंबाजोगाईकडे आपल्या कारने (क्र. एमएच 44 एस 3983) परतत होते. यावेळी चनई ता. अंबाजोगाई Ambajogai जवळील जनाई क्रेशर केंद्रानजीक एका उतारावर कार वरील ताबा सुटल्याने कार एका झाडाला आदळली. या भीषण अपघातात terrible accident डॉ. प्रमोद राजाभाऊ बुरांडे (वय 39) व डॉ. रवि संतोष सातपुते (वय 38) या दोन्ही तरुण डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. हे दोन्ही डॉक्टर नामवंत फिजिओथेरपिस्ट Physiotherapist होते. दोन उमद्या डॉक्टरांच्या अपघाती निधनाने अंबाजोगाई शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!