जिल्ह्यात ३१६ कोरोना बाधित; राज्यात विस्फोट.

बीडः राज्यात रविवारी आजपर्यंतची सर्वाधिक मोठी संख्येत कोरोना बाधित आढळून आले असुन बीड जिल्ह्यातही आजपर्यंत ३१६ बाधित आढळून आली आहेत. शनिवारी पाठवलेल्या नमुन्यांचे अहवाल अद्याप आलेली नाहीत. आयसिएमआर च्या संकेतानुसार देशात कम्युनिटी स्प्रेड मोठ्या प्रमाणात वाढत असून पुढील दोन महिन्यात बाधितांचा उच्चांक देश गाठणार आहे.
रविवार दिवस राज्यासाठी कोरोनाचा विस्फोट करणारा ठरला आहे. राज्यात एकाच दिवसात तब्बल ९ हजार ५१८ रुग्ण आढळून आली. हि संख्या दररोज आढळून येणाऱ्या बाधितांतली सर्वाधिक आहे. बीड जिल्ह्यातही दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. दि.१८ शनिवार पर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधिताची संख्या ३१६ झाली होती. यात बाहेर जिल्ह्यात आढळून येणाऱ्यांची संख्या १५ आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ८ हजार १०८ थ्रोट स्वॅब तपासणी करण्यात आली आहेत. यापैकी ३०१ पॉझिटीव्ह तर ७ हजार ४४९ निगेटिव्ह आली आहेत. १३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजवर ९ मृत्यूची नोंद आहे. रुग्णालयात १३३ रुग्ण दाखल असून १७४ बरे झाले आहेत. एकुण स्वॅब पैकी २३६ प्रलंबित, ९२ अनिर्णित तर १५ नाकारण्यात आली आहेत. बीड जिल्ह्यात खबरदारी म्हणून घेतलेल्या निर्णयात ३४ हजार ६४० लोकांना गृह अलगीकरण तर ४२७ लोकांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले. शनिवारी पाठवण्यात आलेल्या नमुन्याचे अद्याप अहवाल प्राप्त झालेले नाहीत.