बीड जिल्ह्यावर ‘या’ संकटाचे सावट….

बीडः दि.१४(प्रतिनिधी) बीड (Beed) जिल्ह्यातील पाटोदा पाठोपाठ आष्टी (Ashti) तालुक्यात देखील बर्ड फ्लुने (Bird flu) शिरकाव केल्याची घटना घडली असताना शिरापुर येथे परसातील ४३६ कोंबड्या अज्ञात रोगाने दगावली आहेत. या कोंबड्याचा मुत्युचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून जिल्ह्यात सध्या बर्ड फ्ल्यूचे संकट घोंगावत आहे.
आष्टी (Ashti) तालुक्यातील शिरापुर येथील चव्हाण व तागड वस्तीवर मंगळवारी सायंकाळी अचानक सात शेतकऱ्यांच्या परसातील पाळीव ४३६ कोंबड्या दगावल्या. हा प्रकार पशुसंवर्धन विभागाला समजाताच बुधवारी सकाळी अधिकारी गावात दाखल झाले. तोवर मेलेल्या कोंबड्या गोण्यात घालुन फेकुन देण्यात आल्या होत्या. त्यानंतर एक मृत व तीन घायाळ असे चार कोंबड्या त्यांनी घेऊन त्याचा पंचनामा करून त्यांना कोणता रोग आहे यांचे निदान करण्यासाठी नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. परिसरातील शेतकऱ्यांनी काळजी घेऊन पक्षी, व कोंबड्या मृत अवस्थेत आढळून आल्यास त्वरीत पशुसंर्वधन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांनी केले. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने मुगगाव येथील मृत कावळ्यांचा बर्ड फ्ल्यू (Bird flu) पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करुन खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पक्षी स्थलांतरातून या रोगाचा फैलाव गतीने होवू शकतो. यामुळे सध्या बीड जिल्ह्यावर बर्ड फ्ल्यूचे सावट आहे.