प्रेमी युगलाची आत्महत्या; अंबाजोगाईतील राजेवाडी येथील घटना.

अंबाजोगाई दि.20 मे – अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील राजेवाडी येथील 24 वर्षीय तरुण आणि 18 वर्षीय तरुणीने झाडाच्या फांदीला एकत्रित गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. सदरील घटना ही प्रेमप्रकरणातून घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.

(The suicide of a loving couple; Incident at Rajewadi in Ambajogai.)

अनिता शेषेराव राठोड (18) आणि प्रवीण सुधाकर काचगुंडे (24) अशी त्या दोघा मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अनिता आणि प्रवीण हे दोघेही बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आपापल्या घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी सकाळी अंदाजे 11 वाजण्याच्या आसपास राजेवाडी शिवारातील गायरानाच्या उतारावरील लिंबाच्या झाडाच्या एकाच फांदीला एकाच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली.

सदरील घटना दुपारी 4 च्या सुमारास काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना (Police) त्याबाबत माहिती दिली. ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरिक्षक महादेव राऊत, उपनिरीक्षक केंद्रे, बीट अंमलदार गुट्टे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आले.

दरम्यान, प्रेमप्रकरणाला होत असलेल्या विरोधामुळे या प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. पुढील तपास अंबाजोगाई (Ambajogai) ग्रामीण पोलिस (Police) करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!