बीड जिल्ह्याची धडकी वाढतेय.. आज संख्येत मोठी वाढ; पहा तालुकानिहाय आकडेवारी….

बीड दि.14 जानेवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2265 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 64 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 2201 जण निगेटिव्ह आहेत. आज सर्व तालुक्यात रुग्ण आढळले असून अंबाजोगाई, आष्टी व परळीत अनेक दिवसानंतर उद्रेक दिसला.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-5, अंबाजोगाई-11, आष्टी-13, धारुर-2, गेवराई-1, केज-3, माजलगाव-5, परळी-16, पाटोदा-3, शिरुर-1, वडवणी-4 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत आज धडकी भरवणारी वाढ दिसून आली आहे. अंबाजोगाई, आष्टी व परळीत दोन अंकी संख्या आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार काल 7 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2842 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 205 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 2.21 झाला आहे.

दरम्यान, राज्यात बुधवारीदेखील 46 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज देखील कोरोना रुग्णांची संख्या 46 हजार 406 रुग्ण ( New corona cases in Maharashtra ) सापडले आहेत. त्यापैकी मुंबईत सर्वाधिक 13 हजार 702 बाधितांची नोंद झाली आहे. त्यातील 36 रुग्णांचा मृत्यू ( corona patient deaths in Maharashtra ) झाला आहे.

तर सक्रिय रुग्ण ( Maharashtra Active Corona Case ) देखील 2 लाख 51 हजार 828 इतके आहेत. मात्र, राज्यात ( Maharashtra Todays Omicron Patinet Number) ओमायक्रोनचा एकही रुग्ण आढळून नाही, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!