मातृत्व दिनीच आई लेकराचा दुर्दैवी मृत्यू; गेवराई तालुक्यातील संगम जळगावची घटना.

गेवराई दि.9 मे – गेवराई तालुक्यातील संगम जळगाव येथील आई व पाच वर्षाच्या मुलाचा गावालगत असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात पाण्यात बूडुन दुर्दैवी मृत्यु (unfortunate death) झाल्याची घटना आज सकाळी घडली. आज सर्वत्र जागतिक मातृत्व दिन (Mother’s Day) साजरा होताना ही दुर्दैवी घटना मन हेलावून टाकणारी आहे.

(The unfortunate death of Mother & Son on Mother’s Day; Incident at Sangam Jalgaon in Gevrai taluka.)

याबाबत सविस्तर माहिती अशी की गेवराई (Gevrai) तालुक्यातील संगम जळगाव येथील पल्लवी गोकुळ ढाकणे (26) हि विवाहित महिला आपल्या पाच वर्षाच्या समर्थ गोकुळ ढाकणे (5) मुलासह सकाळी नदीपात्रात दररोज प्रमाणे धुणे धुण्यासाठी गेली होती.

यावेळी महिला धुणे धुण्यात मग्न असताना मुलगा समर्थ खेळता खेळता पाण्यात गेला. हि बाब लक्षात येताच त्याला वाचण्यासाठी आई देखील पाण्यात उतरली. परंतू दुर्दैवाने याठिकाणी खोल पाणी असल्याने आई व मुलगा या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच वाचवण्यासाठी प्रयत्न झाला.

मात्र तत्पुर्वीच दोघांचाही करुण अंत झाला होता. संगम जळगाव परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आई व मुलाचे पार्थिव शवविछेदन करण्यासाठी गेवराई उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आले. दोन्ही प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!