लाच स्विकारताना दोन पोलिस चतुर्भूज; अंबाजोगाईमधील घटना.

अंबाजोगाई दि.29 एप्रिल – अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची घटना आज दि.29 रोजी अंबाजोगाईत (Ambajogai) घडली.
74 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीवरुन आरोपी लोकसेवक नितीन चंद्रकांत चौरे, वय 33 वर्षे, व्यवसाय-नोकरी, वर्ग -3, पोलीस नाईक, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन (Police Station), अंबाजोगाई जि. बीड. व प्रमोद प्रताप सेंगर (ठाकूर), वय 51 वर्षे, सहा.पोलीस उपनिरीक्षक, ने. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन, अंबाजोगाई, जि. बीड यांना सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले.
यातील तक्रारदार व त्यांचे कुटुंबियांवर शेतीचे कारणावरून दाखल गुन्ह्यात तपासात मदत करून, पोलीस ठाण्यातच जामीन करण्यासाठी व प्रतिबंधक कारवाई तहसीलदार कार्यालय अंबाजोगाई येथेच करण्यासाठी 25000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती लाच रक्कम 15000/- रुपये लाच (Bribe) रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले आहे, म्हणून सदर बाबत अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे. सापळा अधिकारी, श्री.अमोल धस, पोलीस निरीक्षक (Police Inspector), ला.प्र.वि.बीड यांनी डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) , ला प्र वि औरंगाबाद, विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि औरंगाबाद, शंकर शिंदे, पोलीस उप अधीक्षक, ला प्र वि बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून कारवाई केली.
सदर प्रकरणातील सापळा पथकात पोलीस अमंलदार श्रीराम गिराम, भरत गारदे, अमोल खरसाडे, अविनाश गवळी,चालक गणेश म्हेत्रे ला.प्र. वि.बीड आदीचा समावेश होता. भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास टोल फ्री क्र:- 1064 लाप्रवि बीड.दूरध्वनी क्र:-02442-222649 व क्र – 9355100100, मो 9823391766 पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद 8888807299 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
( Two police quadrilaterals accepting bribes; Incidents in Ambajogai.)