हवामान

Unseasonal rain पुन्हा अवकाळीचे सावट, बीडसह 9 जिल्ह्यात कहर ; प्रशासनाने दिला इशारा.

55 / 100 SEO Score

बीड दि.26 एप्रिल – Unseasonal rain पुन्हा अवकाळीचे सावट महाराष्ट्रावर असून मराठवाडा व विदर्भासह इतर 9 जिल्ह्यात काल गारपीटीने प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळीचा धोका पाहता बीड (Beed) जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हवामान विभागाच्या (Meteorology Department) सुचनेनंतर जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

( Unseasonal rain again, wreaking havoc in 9 districts including Beed; The administration gave a warning.)

गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात अवकाळीचा कहर दिसून येत आहे. अवकाळी पावसात (Unseasonal rain ) गारपीट होवून शेती पिकांसह फळबागा उध्वस्त झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. काल दि.25 रोजी महाराष्ट्रात विदर्भ व मराठवाड्यात प्रचंड गारपीट झाली. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, अमरावती, भंडारा, बुलढाणा जिल्ह्यात तर मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली व जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यातच हवामान विभागाने (Meteorology Department) राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील काही दिवस अवकाळी बरसण्याची अधिक शक्यता वर्तवली आहे.

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी बीड जिल्ह्यात दि.25, 26 एप्रिल रोजी अॉरेंज अलर्ट तर 27 व 28 एप्रिल रोजी येलो अलर्टचा इशारा दिला आहे. दि.26 बुधवारी गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली असून 27 व 28 रोजी वीजांच्या गडगडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता तसेच ताशी 30 ते 40 प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या सुचनेनंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय बीडच्या (Beed) वतीने जिल्ह्यात सतर्कता व काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!