सावधान… बीडसह राज्यातील बारा जिल्ह्यांना हवामान खात्याचं अलर्ट.

पुणे दि.28 मे – गेली दोन दिवस राज्यातील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला आहे. मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जेनेसह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. यानंतर भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) बीडसह राज्यातील 12 जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.
मागिल काही दिवसात राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात मेघसरी कोसळल्या. मराठवाड्यातही बीड ( Marathwada Beed) जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या मुळे उन्हाची तीव्रता कमी होवून हवेत गारवा आला आहे. राज्यात शेतकरी वर्ग मान्सूनपूर्व मशागतीत व्यस्त आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत मान्सूनचा प्रविस मंदावला होता. मान्सूनचा श्रीलंकेतुन पुढील प्रवास आता सुरु झाला आहे. येत्या 48 ते 72 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी पुढील चार दिवस महत्त्वाची आहेत.
येत्या 30 आणि 31 मे रोजी राज्यात मान्सूनपूर्व पावसाचं अलर्ट देण्यात आला आहे. बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर (Latur) , आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरी -सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात 30 मे रोजी यलो अलर्ट ( Yellow Alert ) देण्यात आला आहे. राज्यातील 12 जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
( Warning … Meteorological department alerts 12 districts of the state including Beed. )