Yellow Alert बीड जिल्ह्यासाठी येलो अलर्ट ; वादळी वारा व पावसाने झोडपले.

बीड दि.10 जून – Yellow Alert हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी बीड जिल्हयासाठी दिनांक 09 जून 2023 ते 12 जून, 2023 या चार दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या अलर्टनंतर शुक्रवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वारा व मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. Yellow Alert for Beed District; Tormented by stormy wind and rain.
दिनांक 09 जून, 2023 ते 12 जून, 2023 या चार दिवसात जिल्हयात तुरळक ठिकाणी ताशी 30 से 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगाच्या गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी वर्तवली आहे. दरम्यान, केरळात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर राज्यात चार दिवसांत पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे. तत्पुर्वीच शुक्रवारी (दि.9) बीड Beed District जिल्ह्यात अनेक भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्यात अनेक झाडे उन्मळून पडली असून घरावरील पत्रे उडाल्याचे दिसून आले. हवामान खात्याच्या Indian Meteorological Department येलो अलर्ट Yellow Alert नंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने खबरदारीची उपायोजना म्हणुन खालील प्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन केले आले.
अशी घ्या आपली व कुटूंबाची काळजी…
1. विजेच्या गडगडासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळया जागेत आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
2. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओटयावर थांबू नका.
3. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तु त्वरित बंद करा.
4. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहा.
5. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
हे करणे टाळा…
1. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करु नका. 2.शॉवरखाली आंघोळ करु नका.
3. घरातील बेसिनचे नळ पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणाचा वापर करु नका.
4. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातुच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
5. उंच झाडांच्या खाली आसरा घेऊ नका.
6. धातुंच्या उंच मनोज्याजवळ उभे राहू नका. 7. जर आपण घरात असाल तर उघडया दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना बाहेर पाहू नका, ते बाहेर थांबणे इतकेच धोकादायक आहे.