घात अपघात

बारा तासात अंबाजोगाईजवळ दुसरा अपघात; तर केजजवळ तहसीलदाराच्या वाहनाची दुचाकीला धडक.

अंबाजोगाई दि.24 एप्रिल – अंबाजोगाई तालुक्यातील सायगांवजवळ काल सकाळी या अपघात होऊन 8 ठार तर 10 जण जखमी झाल्याची दुर्घटना घडली होती. या अपघातास बारा तास उलटत नाही तोच रात्री 10 च्या सुमारास याच अंबाजोगाई-बर्दापूर रस्त्यावर पुन्हा अपघात (Accident) झाला. तर याच दरम्यान केजजवळ अंबाजोगाईच्या तहसीलदारांच्या वाहनाने एका दुचाकीस धडक दिल्याची घटना घडली आहे.

काल दि.23 शनिवार बीड (Beed) जिल्ह्यासाठी अत्यंत हृदयद्रावक अपघात वार ठरला. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील सायगांवजवळ क्रुझर जीप व ट्रकची समोरासमोर धडक होवून आठ जण जागीच ठार होवून दहा जण जखमी झाले. या अपघाताला बारा तास उलटत नाही तोच याच ठिकाणी रात्री पुन्हा दुहेरी अपघात झाला आहे.

रस्त्यावर उभ्या पंक्चर झालेली ऊसाची ट्रॉलीस रिफ्लेक्टर (रेडियम) नसल्याने इनव्हा गाडीच्या चालकाला लक्षात न आल्याने ती सरळ पाठी मागून ट्रॉली खालीत घुसली. या पाठोपाठ एक दुचाकी ही ट्रॉलीच्या खाली घुसली. यामध्ये इनेव्हा व दुचाकीचे नुकसान झाले आहे. तसेच अपघातग्रस्तांना मदत करत तातडीने उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.

तहसीलदारांच्या वाहनाचा केजजवळ अपघात…
केज – बीड महामार्गावर अंबाजोगाई तहसीलदारांची शासकीय जीप आणि दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. नायब तहसीलदार व चालक किरकोळ जखमी आहेत. जखमींना अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात हलविले आहे. शनिवारी (दि.23) अंबाजोगाईचे नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड हे औरंगाबाद (Aurangabad) येथील आयुक्त कार्यालयातील बैठक आटोपून अंबाजोगाईकडे जात असताना हा अपघात झाला.

सायंकाळी 6.30 वा. केज-बीड राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्र. (548-डी) केज (Kaij) येथील पद्मश्री विठ्ठलराव पाटील सहकारी साखर कारखान्या जवळ सरकारी वाहन क्र. एम. एच.-23 एफ 1515 आणि केज कडून मूक बधिर विद्यालयाच्या दिशेने जात असलेले कर्मचारी परशुराम सिरसाट रा. आष्टी ह. मु. फुले नगर केज यांचा दुचाकी क्रमांक एम. एच. 44 ए ए-3354 समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात परशुराम सिरसाट हे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमी सिरसाट यांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलविले आहे. दरम्यान या अपघातात नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड आणि सरकारी गाडीचे वाहन चालक अंबुरे हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच केज येथील नायब तहसीलदार सचिन देशपांडे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना मदत केली.

( Another accident near Ambajogai in twelve hours; Tehsildar’s vehicle hit a two-wheeler near Kaij. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!