शैक्षणिक

हो आपण ही होवू शकता लक्षाधीश….अक्षय रासकर

69 / 100

किल्लेधारुर

दि.16 एप्रिल – आपण ही ब्लॉगच्या माध्यमातून लक्षाधीश होवू शकता असे प्रसिद्ध ब्लॉगर अक्षय रासकर ( Blogger) यांनी धारुर येथील घेण्यात आलेल्या शिबिरात मार्गदर्शन केले.( Yes you too can become a millionaire… Akshay Raskar )

सध्या इंटरनेटचे युग असून प्रत्येक हातात मोबाईल आलेला आहे. देशभरात कोट्यवधी जनतेच्या हातात इंटरनेट वापरणारे समाजमाध्यम उपलब्ध झालेले आहे. याच माध्यमातून अनेकांनी लक्षाधीश होवून रोजगाराची संधी शोधली आहे. याच माध्यमातून बीड जिल्ह्यातील कोळगाव येथील अक्षय रासकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करत ब्लॉग (Blog) बनवून लक्षाधीश होवून तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

तरुणांना ब्लॉगर होण्याची संधी ; यामाध्यमातून होता येईल कोट्याधिश !

तरुणांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी या हेतूने धारुर (Dharur) येथील समाजसेवक सुरेश गवळी यांनी अक्षय रासकर यांच्या मार्गदर्शनाचे एक दिवसीय शिबिर पंडित दिनदयाल उपाध्याय नाट्यगृहात दि.16 रविवारी घेण्यात आले. यावेळी मंचावर प्रा.नितिन शुक्ला, विशाल दिख्खत, सय्यद शाकेर, सुरेश शेळके, सचिन थोरात, अतिख मोमीन यांची उपस्थिती होती. यावेळी प्रास्तविक करताना सुरेश गवळी यांनी कार्यक्रम आयोजित करण्याचा हेतू हा तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा असून या संधीचे सोने तरुणांनी करावे असे आवाहन केले. यावेळी अक्षय रासकर यांनी ब्लॉग बनवण्याचे प्रशिक्षण देवून तरुणांनी लक्षाधीश होण्याचा मार्ग दाखवला. या शिबिरास सभागृहात मोठ्या प्रमाणात तरुणांनी उपस्थिती लावली. यावेळी तरुणांच्या विविध प्रश्नांना रासकर यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इश्वर खामकर यांनी केले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!