धारुर परिसरात अज्ञात प्राण्या कडून म्हशीचा फडशा…. शेतकऱ्यांत दहशत

किल्लेधारूर दि.१८(वार्ताहर) शहरापासून जवळच असलेल्या गोपाळपुर शिवारात अज्ञात प्राण्यांने शेतकऱ्यांच्या गोठ्यावर बांधलेल्या म्हशीचा फडशा पाडला असून या परिसरातील शेतकऱ्यांत यामुळे दहशत (terror) पसरली आहे.

शहरातील शेतकरी आवेज हाजी अब्दूल रशीद कुरेशी यांची गोपाळपूर शिवारात शेती आहे. या शेतावर गायी, म्हशी, बैल असा बैलबारदाना गोठ्यात आहे. दि.१६ च्या रात्री या गोठ्याच्या परिसरात बांधलेल्या म्हशीला अज्ञात प्राण्याने फस्त केल्याची घटना घडली. याबाबत कुरेशी यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून पशूवैद्यकीय अधिकाऱ्याकडून घटनेचा पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात आले. सध्या जिल्ह्यात बिबट्याचा( Leopard) धुमाकूळ असल्याने सर्वत्र दहशतीचे (terror) वातावरण आहे. याच काळात सदरील घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांत भिती पसरली आहे. महिनाभरातील ही तिसरी घटना असल्याचे कुरेशी यांनी म्हटले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. यापुर्वीही जहागीर मोहा येथे अज्ञात प्राण्याने तब्बल २४ शेळ्या मारल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!