अधिवेशनावर कोरोनाचे सावट… पहिल्याच दिवशी आढळले ३२ पॉझिटीव्ह

मुंबई: दि.१ मार्च- राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरु होत असून या अधिवेशनावर पहिल्याच दिवशी कोरोनाचे सावट दिसून आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी 3200 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी 32 जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आले आहेत. यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांसह दोन पत्रकार व विधीमंडळ, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं समजते. यात एकाही आमदाराचा समावेश नाही.
(Corona’s attack on the convention … 32 positives were found on the first day)
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) 1 ते 10 मार्च असे दहा दिवस होत आहे. 8 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्चला बजेटवर चर्चा होणार आहे. या दरम्यान दोन वेळा कोरोना चाचणी होणार आहे. पाच दिवसाच्या अंतराने या चाचण्या होणार आहेत. कोणी कोरोना बाधित झाले तर हे स्पष्ट व्हावे म्हणून खबरदारी घेत दोन वेळा चाचणी करण्यात येणार आहे.
अधिवेशन (Budget session) सुरु होण्यापूर्वी केलेल्या चाचणीत 32 जण कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) आढळले आहेत. यात पोलिस कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी व विधिमंडळातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सुदैवाने विधानभवन येथे केलेल्या कोरोना टेस्टमध्ये एकही आमदार पॉझिटीव्ह नसल्याची माहिती समोर आली आहे. बहुतेक आमदारांनी खासगी कोरोना टेस्ट केलेल्या आहेत. यामुळे सध्या याबाबत अधिकृत माहिती विधान भवनाकडून मिळाली नाही.