शिंदे सरकार किती काळ टिकणार ? हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही.

44 / 100

मुंबई दि.1 जुलै – शिंदे सरकार किती काळ टिकणार ? हा शिवसेना मुख्यमंत्री नाही. अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर प्रथमच माजी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली. ( How long will the Shinde government last? This Shiv Sena is not the Chief Minister. )

शिंदे सरकार किती काळ टिकणार ? नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शपथ घेतली. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी आज शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत यावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. काल मी नवीन सरकारचे अभिनंदन केले. भाजपने तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. मी अडिच वर्ष हेच सांगत होतो. माझ्यासमोर 3 प्रश्न आहेत. अडिच वर्षांपूर्वी मी हेच सांगितलं होतं, असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसैनिंकांना बाजूला सारून असा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं उद्धव ठाकरे, म्हणालेत.

जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
राज्यात स्थापन झालेले नवीन सरकार म्हणजे एक प्रासंगिक करार आहे. याची माहिती भाजपाला देखील आहे. हे सरकार पुढे किती काळ टिकणार आणि 2024 च्या निवणुकांमध्ये ते पुन्हा निवडून येतील की नाही.
हे भाजपला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी वर्तविले आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जयंत पाटील शुक्रवारी माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की 2024 च्या आधीच राज्यात मध्यावधी निवडणूका घ्याव्या लागतील. मात्र त्यावेळी हे निवडून येतील की नाही याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगल्याप्रकारे आहे. त्यामुळे बंडखोर गटावर किती काळ अवलंबून राहायचं हे भाजप लवकरच ठरवेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!