पहिल्या फेरीत राष्ट्रवादीकडे दोन तर भाजपाकडे एक ग्रामपंचायत.

42 / 100

किल्लेधारूर दि.20 डिसेंबर – पहिल्या फेरीत पांगरी, खोडस व कोळपिंपरी ग्रामपंचायत मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. यात पहिल्या फेरीत दोन ग्रामपंचायतचा कौल राष्ट्रवादीकडे तर एकाचा भाजपाकडे कौल दिसून आला.

तहसील परिसरात चोख बंदोबस्तात मतमोजणीस सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. 100 मीटरपेक्षा जास्त अंतरावर बॕरीकेटस लावण्यात आली आहेत. चारचाकी वाहनांना तहसील कार्यालयाच्या रस्त्यावर बंदी करण्यात आली. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीप्रमाणे पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसला दोन ठिकाणी तर एका ठिकाणी भाजपाकडे मतदारांचा कौल दिसून येत आहे. नुकतीच धारुर कृषि उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाल्यामुळे ग्रामपंचायत निकालाकडे लक्ष लागून आहे.


पहिल्या फेरीतील पांगरी, खोडस व कोळपिंपरी ग्रामपंचायतचे निकाल येण्यास सुरुवात झाली. पांगरी व कोळपिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पॕनलचा तर खोडस ग्रामपंचायत (Gram Panchayat) भाजपाच्या (BJP) पॕनलचा विजय झाला आहे. दुसऱ्या फेरीत आवरगाव, चिंचपूर व वाघोली ग्रामपंचायतच्या मतमोजणीस सुरूवात झाली आहे.
( In the first round, NCP has two and BJP has one Gram Panchayat. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!