कोरोंना विशेष

बीडचे पोलीस अधिक्षक कोरोना पॉझिटीव्ह; देशातील या बड्या नेत्यालाही कोरोनाची बाधा.

बीड दि.23 जानेवारी – बीडचे पोलीस अधिक्षक आर. राजा यांना कोरोनाची बाधा झाली असून ते सध्या गृह विलगीकरणात आहेत. तर देशाचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू हे देखील कोरोना बाधित आले आहेत.

(Beed Superintendent of Police Corona Positive; Corona is also a threat to this great leader of the country.)

दि. 22 जानेवारी रोजी सौम्य लक्षणे आढळल्याने बीडचे पोलीस अधिक्षक (Superintendent of Police) आर. राजा यांनी कोरोना चाचणी केली. आर. राजा यांचा अहवाल दि. 23 जानेवारी रोजी आला. यात ते पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले.

त्यानंतर ते शासकीय निवासस्थानी गृहविलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. दरम्यान, संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी (Corona Test) करुन काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2144 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 290 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1894 जण निगेटिव्ह आहेत.

उपराष्ट्रपती कोरोना पॉझिटीव्ह
देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu) यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याबाबत उपराष्ट्रपती कार्यालयाने ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यामुळे ते 26 जानेवारीला होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू हे हैदराबाद येथे असून त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे ते एक आठवडा सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणार आहेत. संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करावी आणि स्वत:ला आयसोलेट करावे, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!