नेकनुर प्रकरण… पती पत्नीच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण; धक्कादायक माहिती आली समोर.

बीड दि.17 डिसेंबर – बीड (Beed) तालुक्यातील नेकनुर ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या वैतागवाडी येथे घडलेल्या घटनेचे गुढ उकलले असून धक्कादायक माहिती समोर आली. नवदाम्पत्य असलेल्या पती पत्नी ने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर प्रथम पत्नीचा गळा दाबुन हत्या (Murder) करुन पतीने आत्महत्या केली असल्याचे उघड झाले आहे.
(Neknur case … Husband-wife suicide case takes a different turn; Shocking information came to the fore.)
बीड तालुक्यातील व नेकनुर ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या वैतागवाडी येथे काल धक्कादायक घटना घडली असुन नव विवाहित पती पत्नीने आत्महत्या (suicide) केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. वैतागवाडी येथील राजेश जगदाळे (वय 27) आणि दिपाली डिसले (वय 24) दोघेही वैतागवाडी येथील रहिवासी आहेत. यांचा विवाह 11 महिन्यापूर्वी वैतागवाडी येथे झाला होता. मयत महिला ही गरोदर असल्याची माहिती समोर आली. दि.16 डिसेंबर गुरुवार रोजी दुपारी 2.15 वाजताच्या सुमारास वैतागवाडी येथे राहत्या घरात पती पत्नी मृत अवस्थेत आढळून आली होती.
राजेश व दिपाली दोघांचे आई वडील शेतात तुर काढण्यासाठी गेले होते. गावात एका ठिकाणी सोळाव्याचा कार्यक्रम होता म्हणून ते घरी आले असता घराचे दार आतून बंद होते. त्यानी आवाज दिला खटके दिले तरी आतून काहीच प्रतिक्रिया येत नसल्याने त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला असता दिपाली जगदाळे याचा मृतदेह बेडवर पडलेला होता तर राजेश जगदाळे हा लोखंडी आळुला गळफास घेतलेल्या अवस्थेत होता.
या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आज शवविच्छेदनाच्या अहवालानंतर पत्नीचा गळा दाबुन हत्या झाल्याचे उघड झाले. या हत्येनःतर पतीने आत्महत्या केली. नेकनुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) मुस्तफा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक (PSI) विलास जाधव पोलीस कर्मचारी परमेश्वर सानप, प्रशांत क्षीरसागर हे घटनास्थळी हजर झाले होते.
सदरील घटनेमुळे वैतागवाडीत शोककळा पसरली होती. मात्र आता प्रकरणाने वेगळी कलाटणी घेतली असून पतीने पत्नीची हत्या का केली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांत आता प्रथम खुनाचा गुन्हा नोंद होवून नेकनुर पोलिस पुढील तपास करणार आहे.