दोन बळी घेतलेल्या बिबट्याचा ड्रोनच्या मदतीने शोध सुरु…..

बीडः– आज सकाळी एका बालकाचा बळी गेल्यानंतर वन विभागाने स्वंतत्र पथके तयार करुन बिबट्याला Leopard जेरबंद करण्यासाठी अॉपरेशन सुरु केले असून तब्बल शंभरावर वन कर्मचारी व शार्प शुटर Sharp Shooter याकामात लावण्यात आली. यासाठी ड्रोन Drone कॕमेराची मदत घेतली जात आहे.

आष्टी Ashti तालुक्यातील सुरडी येथे तीन दिवसांपुर्वी बिबट्याने Leopard एका व्यक्तीचा बळी घेतला होता. याच परिसरात असलेल्या किन्ही येथील ९ वर्षीय स्वराज सुनिल भापकर या बालकास आज सर्वांच्या समोर बिबट्याने उचलून नेत दुसरा बळी घेतला. यामुळे आष्टी Ashti, शिरुर, पाटोदा तालुक्यातील नागरीकांत भितीचे वातावरण पसरले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने थेट जंगलात शोध मोहिम सुरु केली आहे. यासाठी शंभरावर कर्मचारी कामगिरीवर पाठवण्यात आली असून औरंगाबाद व अमरावतीहून शार्प शुटर Sharp Shooter दाखल झाले आहेत. यासोबतच बिबट्यावर ड्रोनची Drone नजर ठेवण्यात येत असून लवकरच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!