अज्ञात प्राण्याकडून १६ शेळ्यांचा फडशा…. भोकरदन तालुक्यातील घटना

भोकरदनः दि.३०- भोकरदन (Bhokardan) तालुक्यातील देहेड येथील शेतकऱ्याच्या गोठ्यावर अज्ञात वन्यप्राण्याने १६ शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना ३० जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली आहे. यापुर्वीही बीड (Beed) जिल्ह्यातील धारुर तालुक्यात अशी घटना घडली आहे. हा हल्ला बिबट्या (Leopard) किंवा लांडग्याचा असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.

भोकरदन (Bhokardan) तालुक्यातील देहेड येथील शेतकरी परमेश्वर रतन बावस्कर यांचे भांडरगडा जवळील सुतारी नावाच्या शेतात जनावरांचा गोठा आहे. बावस्कर यांनी २९ रोजी रात्री या गोठ्यात ६ म्हशी, बैल व २० शेळ्या बांधुन ठेवल्या होत्या. ते स्वतः रात्री गोठ्यावर झोपले. दि. ३० रोजी पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान झोपेतून उठून त्यांनी शेणपानी केले व जनावरांना चारा टाकून ६.३० वाजेच्या दरम्यान आंघोळीसाठी देहेड येथे घरी आले. मात्र त्यानंतर ७ ते ९ वाजेच्या दरम्यान वन्यप्राण्यानी या गोठ्यावर सामूहिक हल्ला चढवला व जाळीमध्ये प्रवेश करून १० मोठ्या व ६ लहान शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना घडली. यात शेतकऱ्याचे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बावस्कर हे सकाळी ९ वाजेच्या दरम्यान घरून गोठ्यावर आल्यानंतर त्यांना १६ शेळ्यांचा फडशा पडकेलला दिसला मात्र वन्यप्राणी निघून गेले होते. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. सदरील हल्ला हा बिबट्या (Leopard) किंवा लंडग्यांनी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अशा स्वरुपाच्या तीन घटना काही दिवसांपुर्वी बीड (Beed) जिल्ह्यातील धारुर (Dharur) तालुक्यात घडल्या आहेत. धारुर तालुक्यातील जागीरमोहा येथे २० शेळ्या व गोपाळपुर शिवारात दोन म्हशीची शिकार झाली आहे. अद्याप या शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!