वडिलांची हत्या करणाऱ्या मुलाला जन्मठेप…..

भिवंडी दि.१ जानेवारी :-  शेतात काम करण्यास सांगितल्याच्या रागातून मुलाने वडिलांची कुऱ्हाडीने हत्या (Murder) केली होती. याप्रकरणी पोलिसांनी (Police) दाखल केलेल्या सबळ पुराव्यावरुन आरोपी मुलाला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुरेश धर्मा धिंडा (वय ५०) असे शिक्षा झालेल्या आरोपी मुलाचे नाव आहे.

डिसेंबर २०१७ मध्ये भिवंडी तालुक्यातील पाये गावाच्या हद्दीतील नवे पेंढरी पाडा येथील मला शेतातील कामास मदत कर, असं वडिलांनी सांगताच मद्यपी मुलाने आपले वडील धर्मा शंकर धिंडा (वय ७२) यांची निर्घृण हत्या (Murder) केली होती. या बाबत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस (Police) निरीक्षक, राजीव पाटील व त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी भरत शेगर, राजेंद्र शेंडे, कैलास वाडविंदे, जयेश मुकादम या पथकाने शिताफीने तपास करून आरोपी मुलास अटक केली होती. या प्रकरणी न्यायालयात सबळ पुरावे सादर केले गेले असल्याने ठाणे जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी यांनी आरोपी सुरेश धिंडा यास जन्मठेप व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांची शिक्षा सुनावली आहे. या दाव्यात अॅड. मती मोहळकर यांनी सरकारी बाजू मांडली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!