धारुरला २ पॉझिटीव्ह; जिल्ह्याची द्विशतकी वाटचाल

किल्लेधारूर दि.८आगस्ट- काल धारुरहून पाठवलेली ४० अहवाला पैकी शहरातील शिक्षक कॉलनीत १ तर घागरवाडा येथील १ सहवासित अशी २ जन पॉझिटीव्ह आली आहेत. आज सलग नवव्या दिवशीही पॉझिटीव्ह रुग्ण आढळून येणे सुरुच आहे. जिल्ह्यात आज बीड शहरात ॲन्टीजन टेस्टमध्ये ८६ पॉझिटीव्ह आढळून आल्यामुळे आज दोनशे पेक्षा जास्त संख्या जाण्याची शक्यता आहे.
शहरात गेल्या नऊ दिवसात सतत आढळून येणाऱ्या पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत आज दोनने वाढ झाली आहे. शहराच्या ग्रामिण भागात शिक्षक कॉलनी येथे ४६ वर्षीय पुरुष व तालुक्यातील घागरवाडा येथे ५ वर्षीय सहवासित बालक अशी दोन पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. आजही जिल्ह्यात रुग्णांची संख्या मोठी असून बीड शहरात झालेल्या ॲन्टीजन टेस्टमध्ये ८६ पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातून अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या स्वॅब पैकी पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची माहिती गोळा होणे सुरु असुन आज दोनशेच्या पुढे संख्या जाण्याची शक्यता आहे.