बीड जिल्ह्यातही घडली दुर्दैवी घटना…. गावात हळहळ

माजलगावः दि.९(प्रतिनीधी) बीड जिल्ह्यातील माजलगाव (Majalgoan) तालुक्यात एका पाच वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना दि.८ शुक्रवार रोजी घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

माजलगाव (Majalgoan) तालुक्यातील गंगामसला येथे सदरील दुर्दैवी घटना घडली. गंगामसला येथील मदन सुदामराव सोळंके यांचा पाच वर्षाचा मुलगा उमेश हा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू (Death) पावला. घरात सांडपाण्यासाठी ठेवलेल्या फुटलेल्या टाकीत हातातील पाण्यात पडलेली प्लेट काढण्याचा प्रयत्न करत असताना चिमुकल्याचा तोल जावून पडल्याने ही घटना घडली. घटनेमुळे संपुर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!