धक्कादायक … कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; बीड जिल्ह्यात खळबळ.

बीड दि.25 एप्रिल – बीड (Beed) जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. जिल्ह्यात गेल्या 48 तासात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बीडच्या वरवटी येथील एका 50 वर्षीय अल्प भूधारक शेतकर्याने, लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन तर गेवराई (Gevrai) तालुक्यातील पाचेगाव येथे शेतकरी शंकर दुधा चव्हाण (वय 55) यांनी विषारी औषध प्राशन करत आत्महत्या (Suicide) केली.
राज्यात शेतकरी आत्महत्या सर्वात जास्त मराठवाडा (Marathwada) विभागात होत आहेत. त्यातला त्यात बीड जिल्ह्याचा क्रमांक यात वरचा आहे. कधी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. रविवारी बीड तालुक्यातील वरवटी येथील मंगलदास मनोहर शिंदे (वय 50) या यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
शेतकरी आत्महत्येची दुसरी घटना जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात पाचेगाव येथे घडली. शेतकरी शंकर दुधा चव्हाण (वय 55) यांनी विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही आत्महत्या कर्जबाजारी पणामुळं झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणि गेवराई पोलीस (Police) ठाण्यामध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
( Shocking … Two farmers commit suicide due to indebtedness; Excitement in Beed district. )